Donate To Sakar

SAKAR is striving hard to provide the little babies with a loving and caring atmosphere in our Child Care Unit & ultimately finding them an opportunity to venture into a beautiful journey along with their adoptive families. Just like these blessed ones SAKAR also needs a top class, fully equipped HOME for itself & the children. Entire SAKAR family and not to mention the little ones; from the bottom of our hearts entreat you to help us realize our dream and sincerely appeal to you to come forward with a positive response and be counted as the most valuable social partner of SAKAR.

Shri Nandkishore Muley’s testimonial

Shri Nandkishore Muley of Saraswati Printing Press, Aurangabad has been an integral part of SAKAR since our early days. He has been actively involved in SAKAR’s work since then.

In his kind words-

एखाद्या चांगल्या कामात आपण केव्हा गुंतलो, आपले मन त्या कामात केव्हा रमले याची वेळ, तारीख आपल्याला कधीच सांगता येत नसते. मला तर नक्कीच नाही . कुठल्याही गोष्टीवर वेळ किंवा मुहूर्त ठरवून प्रेम करता येत नसतं. मी ज्या ज्या संस्थांच्या कामामध्ये सहभागी झालो त्यांचा तारीखवार तपशील मी कधीच देऊ शकणार नाही. साकारच्या बाबतीतही असे काही सांगता येणार नाही.

‘साकार’ या संस्थे बद्दल माझ्या मनात जी भावना निर्माण झाली ती पुढील प्रमाणे आहे. ‘साकार’ अनेकांसाठी, विशेषतः ज्यांना नैसर्गिक पालकत्व बहाल झालेले नाही पण पालकत्वाची आवड आहे, जबाबदारी घेण्याची ओढ आहे, अशां सक्षम कुटुंबाला पालकत्वाची भूमिका मिळवून देणारी हि संस्था आहे. उभयतांनी बाळगलेल्या स्वप्नवत प्रवासाचं एक ‘जंक्शन’च ! एका नवजात निरागस जिवाला हवी असलेली प्रेमाचा ओलावा मिळवून देणे, सुन्या सुन्या आयुष्याची गाडी आनंद, आशेच्या मार्गा वरून अपत्य सुखाच्या अनुभूतीतून करून देणे हे संस्थेचे ब्रीद. आयुष्यभर रित्या संसारातील समाधान जोपासणारी हि गाडी म्हणजे ‘साकार’.

मुलां मधील श्रुती-वाणीचा असलेला अभाव विकसित करणाऱ्या संस्थेशी निगडित आणि सामाजिक मानसिकता जोपासणाऱ्या निलिमा सुभेदार यांच्याशी छपाई कामानिमित्ताने साकार संस्थेचे दत्तक विधानाचे कार्य कळत गेले आणि या संस्थेबद्दल आपुलकी निर्माण झाली. ‘साकार’ संस्थेच्या पाठीशी असणारा आधारस्तंभ डॉक्टर सविता पानट व इतर सदस्यांची दत्तक विधान कार्यातील तळमळ बघून मी पण संस्थेचा सभासद झालो. ‘साकार’ संस्थेबद्दल माहिती मिळवत गेली, इतरांना चर्चेतून सांगतही गेलो. यातून मिळालेला एक मोठा आनंद म्हणजे माझ्या अगदी जवळच्या नातेवाईकांनी याच संस्थेतून एक मुल दत्तक घेतले. या मुलाच्या आणि पालकांच्या आयुष्यात भरलेल्या आनंदाला आज फार छान आकार मिळाला आहे. त्याचा मी एक समाधानी साक्षीदार आहे. सध्या फ्रान्समध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे धडे घेत असणाऱ्या या चिरंजीवांच भवितव्य घडवण्यामागे साकारने केलेला शून्य अवस्थेतील केलेले संगोपन व सांभाळ आणि माझ्या नातेवाईक पालकांनी उचललेली जबाबदारी म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वच नव्हे काय?
साकारच्या कामामध्ये समरस झाल्यानंतर एके दिवशी आपल्या संस्थेची ओळख देणारे आणि विषय स्पष्ट करणारे बोधचिन्ह असावे असा विचार डॉक्टर सविता पानट यांच्या मनात आला. नीलिमा ताईंनी तो माझ्याजवळ बोलून दाखवला. माझ्या विचारांनि बोधचिन्हाला मनातून रंगवण्याचं काम सुरू केलं. सहजच ‘साकार’चा लोगो तयार झाला. प्रेमाने जवळ घेणाऱ्या पती-पत्नीच्या कुशीत अतिशय आनंदाने एक बालक झेप घेत आहे असं साधं रेखाचित्र मी तयार केलं. मला ते विषयाशी सुसंबंधित वाटू लागलं, पण ते सगळ्यांनाच आवडेल का? असं वाटून मी तो तात्पुरता आराखडा, चित्र नीलिमा ताईंना दाखवल. मला आवडलं ते सर्वांना आवडलं आणि आज हे बोधचिन्ह साकारची ओळख होऊन बसल आहे. आपण काढलेल्या उभ्या-आडव्या रेषा एखाद्या संस्थेची ओळख होऊन बसतात याचं आज स्वतःलाच कौतुक वाटतंय. पुढे चालून या चित्रात आईच्या चेहऱ्याला हिरवा रंग, वडिलांच्या चेहऱ्याला आकाशी रंग आणि झेप घेणाऱ्या बालकाचा चेहरा हलक्याशा ग्रे म्हणजे राखाडी रंगामध्ये असा बदल मी केला. या रंगांमधून मला आई म्हणजे सांभाळणारी हिरवी धरा, वडील म्हणजे जबाबदारीचे पांघरून – निळे-आकाश आणि ग्रे – राखाडी रंग हे निरागस बालक, असं सुचवायचं आहे किंवा असं अभिप्रेत आहे ! हे सगळं कसं सहज सुचत गेलं समजत गेलं आणि व्यक्त होत गेल माहित नाही पण ‘साकार’ शी नाळ जोडली गेली होती. कुठल्याही संस्थेच्या कामातील समरसता तुमच्यातील आचार विचारांना वृद्धिंगत करते. तुमच्यातील सुप्ततेला वाव देते म्हणून तरी चांगल्या कार्यांमध्ये सहभाग असावाच. या सहभागातून आपली पुढची पिढी या कार्याविषयी विचार करू लागते, कार्यातील महत्त्व तिला समजतं आणि तेही हळूहळू या सामाजिक जाणीवेशी जुळू लागतात. आमच्यापैकी अनेक जणांची मुले या कार्यात रस घेऊ लागली आहे. बरेच जण तर या कार्यात समरस व सहभागी झाले आहेत. आदर्श, पारदर्शीपणा पुढे न्यायचा असेल तर हे एक उत्तम उदाहरण आहे.

निराधार बालकांसाठी हक्काचं घर मिळून देणार ही संस्था आणि जोडप्याला पालक म्हणून ओळख देणाऱ्या या संस्थेमध्ये अनेक ‘सोशल वर्कर’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मुला-मुलींनी सामाजिक कामाचा प्रत्यक्ष अनुभव संपादन केला आहे. आपण करीत असलेल्या कामाशी एकरूप होण्याचा कसब या नवोदित सोशल वर्कर मुला-मुलींना आता चांगलंच अवगत झालं. साकार म्हणजे अनाथ बालकांची शाळा, ‘सोशल वर्कर’ पदावर काम करणाऱ्यांसाठी अनुभव देणारे विद्यालय आणि समाजसेवी सेवेची आवड असणाऱ्यांसाठी एक विद्यापीठ ठरले आहे. येथे तयार झालेल्या काही सोशल वर्करस सरकारी-निमसरकारी खात्यांमधून सांगली पदे भूषवित आहेत.

अगदी छोट्याशा जागेतून सुरू झालेले ‘साकार’ चे बालसंगोपन केंद्र आज दिमाखदार जागेमध्ये एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसला शोभावे असे झाले आहे. अर्थातच यामागे अनेक तळमळीच्या सदस्यांचा, कार्यकर्त्यांचा सहभाग आणि त्याग आहे. शंभर बालकांचा दत्तक विधान झाल्यानंतर एक भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगावकर उपस्थित होते. संस्थेच्या कार्यातील मानवतेचा ओलावा बघून त्यांनी संस्थेच्या मदतीसाठी त्यांच्या वाद्यवृंदासोबत गीतांचा एक कार्यक्रम आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. प्रसिद्ध कवियत्री व साहित्यिक अनुराधा वैद्य यांनी खूप समाधान व्यक्त केले होते. अनेक दिग्गजांनी ‘साकार’ला दिलेल्या भेटीमध्ये मला आठवतात ते वोकहार्ट या नामांकित औषधी कंपनीचे सर्वे सर्व माननीय श्री खोराकीवाला. जन्मताच ज्यांच्या वाट्याला निराधारपणा आला अशा निरागस बालकांची सुश्रुषा, सांभाळ करणारी ही संस्था आणि पुढे त्यांच्या वाटेला समृद्ध आयुष्य मिळावे म्हणून झटणारी ही संस्था मानवतेच्या दृष्टिकोनातून फार मोठे कार्य करीत आहे असा भाव त्यांच्या या भेटीतून आणि बोलण्यातून स्पष्ट झाला. ‘साकार’ करीत असलेले कार्य खरोखर स्पृहणीय आहे व त्याचे सर्व साकार परिवार समाधान आहे यातच सर्व आले.

  • December 18th, 2019
© 2015 Legal. All Rights Reserved. | Designed & Developed By eTCS