Donate To Sakar

SAKAR is striving hard to provide the little babies with a loving and caring atmosphere in our Child Care Unit & ultimately finding them an opportunity to venture into a beautiful journey along with their adoptive families. Just like these blessed ones SAKAR also needs a top class, fully equipped HOME for itself & the children. Entire SAKAR family and not to mention the little ones; from the bottom of our hearts entreat you to help us realize our dream and sincerely appeal to you to come forward with a positive response and be counted as the most valuable social partner of SAKAR.

SAKAR through the eyes of Shivaji Jadhav

SAKAR is blessed to have best wishes and love from so many people whose lives we have managed to touch in one or the other way. On Sakar Ngo’s 25th Anniversary we are happy to share their thoughts about SAKAR in their own words.
The following words come from Mr. Shivaji Jadhav who we are proud to say was one of our very first social worker.

In his words:-

साकार अनेक कुटुंब जोडपी जी अपत्यसुखाची स्वप्ने पाहतात त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास अविरत काम करणारी संस्था मी ‘साकार’ संस्थेत काम करून संस्थेत काही काळासाठी का असेना सदस्य / भाग होतो याचा मला मनापासून सार्थ अभिमान आहे.

साकार संस्थेचे कार्य हे महिला मंडळामार्फत म्हणजे सर्व पदाधिकारी या महिला असून त्या सामाजिक कार्यात आहेत. अशामार्फत चालविली जाणारी संस्था आहे.

साकार संस्थेची सुरवातीपासून काही तत्वे होती आणि त्या तत्वास अनुसरून पदाधिकारी यांनी काम केले आहे. तसे जो कोणी संस्थेस जोडला आहे. त्यासहि सादर तत्वे पाळण्याच्या सवयी संस्थे मार्फत लावल्या आहेत.

संस्थेच्या उद्देशानुसार प्रामाणिकपने खरेनाणे काम करणे, नियमानुसार काम करणे, गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेणे, वेळ पडल्यास काम झाले नाही तरी चालेल परंतु चुकीच्या मार्गाचा अवलंब करायचा नाही. यावर सर्व पदाधिकारी ठाम, संस्थेच्या आर्थिक व्यवहार बचतीने करणे, गरजेनुसार पदाधिकारी स्वतः देणगीद्वारे मदत करून संस्थेची कामे करत असत.

साकार संस्थेमार्फत सुरवातीपासून कालानुरूप त्या त्या समस्येवर फोकस देऊन काम केले आहे. उदा. कुमारी मातेचा प्रश्न, त्या अनुषंगाने असणाऱ्या सामाजिक समस्या यावर काम केले आहे. त्यासाठी सर्व संबंधित गटामधून विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती केली आहे.

किशोरवयीन मुलामुलींना वयात येताना होणारे बदल व लैगिकता याबाबतचे शिक्षण, कुमारी माता व त्यांचे बालक या बाबतचे प्रश्न हाताळन्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यामध्ये या विषयाच्या अनुषंगाने जनजागृती विविध कार्यशाळा नेटवर्किंग इत्यादी ज्या मुळे निश्चितच त्या त्या वेळेसचे प्रश्न सोडविले आहेत.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचे बालकल्याण बाबतचे विचार, त्यात कोणत्याही पदाधिकारी, सदस्याचा विरोध नाही, सर्वांचे एकमत असतं.

खऱ्या अर्थाने महिला, युवती व बालकांचे कल्याण करण्याचे काम साकार मार्फत झाले आहे.

व्यक्तिगत विचार करायला झाल्यास साकार संस्थेमुळे आणि संस्थेतील पदाधिकारी यामुळे सामाजिक कार्य, कार्यालयीन कामकाज ,सामाजिक दृष्टीकोन इत्यादि बाबतीत मी घडलो, त्याबाबतचे संस्कार साकार मध्ये मिळाले आहेत. जॉब Satisfaction खऱ्या अर्थाने मला साकार मध्ये मिळाले आहेत.

सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना खरे शिक्षण हे संस्थेच्या सचिव नीलिमा सुभेदार मॅडम यांच्याकडून मिळाले आहे. ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. चूक झाल्यानंतर सुधारणात्मक दृष्टीने मार्गदर्शन करून . काम करण्याची संधी दिली त्यामुळे मी त्यांना जिजामाता मानतो. त्याच्या शिकवणीमुळे पुढील कालावधीत वेगवेगळ्या पदावर काम करताना मला खूप मोठा फायदा झाला आहे.

साकार हे एक मोठे कुटुंब आहे येथे काम करत असताना संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, सहकारी, कर्मचारी हे अगदी जवळचे वाटतात. संस्थेतील वातावरणामुळे पदाधिकारी सदस्यांच्या वागणुकीमुळे आपलेपणामुळे काम करण्यास खूप हुरूप येत असत व काम करण्यात आनंद वाटत असे.

संस्थेतील इतर सदस्यांकडून, पदाधिकाऱ्या कडूनहि वेळोवेळी मार्गदर्शन, सहकार्य मिळाल्यामुळे माझा वेगवेगळ्या पद्धतीने विकास झाला आहे. डॉ. निलीमा पांडे मॅडम, डॉ . सविता पानट मॅडम, ऍड. अर्चना गोंधळेकर, डॉ . बिंदू, आशा नानिवडेकर, साधू मॅडम,अशा सर्वांचा सहभाग आहे. सर्वाचा मी नामोल्लेख करत नाही. परंतु सर्व पदाधिकारी, सदस्य, सहकारी कर्मचारी या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

साकार कडून जे मिळाले आहे त्यामुळे मी चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्य करत आहे असे मला वाटते.

  • December 18th, 2019
© 2015 Legal. All Rights Reserved. | Designed & Developed By eTCS